वाचन, अभ्यास करायला सुरुवात केली की अनेकांना झोप येते. मात्र यामागे कंटाळा हेच कारण असते असे नाही. अनेकदा अभ्यास करताना बसण्याची स्थिती चुकीची असल्यास झोप येऊ शकते. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डोळ्यांशी संबंधित स्नायूंवर ताण येतो. आपला मेंदू वाचलेल्या गोष्टी आठवून त्या एकत्रित साठवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा डोळ्यांचे स्नायू थकतात अथवा मंद गतीने काम करतात तेव्हा झोप येऊ लागते. वाचन, अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून खालील गोष्टी करा –
खुल्या जागेत अभ्यास करा, अंधाऱ्या जागेत अभ्यास करू नका.
खुल्या जागा जसे छत, बाल्करनीमध्ये हवा आणि उजेड चांगला असतो यामुळे अशा ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. यामुळे कमी सुस्ती येईल. तसेच झोपही येणार नाही.
तुम्ही जिथे बसून वाचत आहात, तिथे बाहेरून हवा आणि प्रकाश दोन्ही असावं. हवा खेळती असावी यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतील आणि वाचताना तुम्हाला झोपही येणार नाही.
जेवण जेवल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसू नका. तसेच जेवणही हलकेच घ्या. त्यामुळे सुस्ती येणार नाही.
अंथरूणावर झोपून अभ्यास करू नका.