* केळीची साल हलक्या हाताने ५ मिनिट दातांवर घासा.

* एक चमचा बेकिंग सोड्यात थोडे पाणी किंवा लिंबाचा रस मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

* तुळशीची पाने सावलीत वाळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश करा.

* दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात.

* लिंबू आणि संत्र्याची साल वाळवून बारीक पावडर तयार करून त्या पावडरने दात घासावेत.

* ऊस, गाजर, काजू, बदाम, मनुके यांसारखे पदार्थ खावेत. त्यामुळे दातांमधील स्वच्छता होण्यास मदत होते.

* मिठामध्ये मोहरीचे तेल दोन ते तीन थेंब टाकावेत. या मिश्रणाने दात घासावेत.

* कापसाच्या सहाय्याने दातांवर ऑलिव्ह ऑईलने मसाज करा.

* अननसाची फोड घेऊन दातांवर चोळा.

* कडुनिंबाच्या पावडरने किंवा कडुनिंबाच्या काडीने ब्रश करावा.

* स्ट्रॉबेरी बारीक करुन त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा. बनलेले मिश्रण ब्रशने दातांवर घासा.

 

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार