झिका व्हायरस (Zika virus) पुन्हा चर्चेत आला आहे कारण, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. जाणून घ्या झिका व्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी माहिती –
झिका व्हायरस कसा पसरतो
एडीस प्रजातीच्या डासांद्वारे झिका व्हायरसचा संसर्ग पसरतो. हे डास सहसा दिवसा चावतात. झिका संक्रमित व्यक्तीस चावलेला डास चावल्यामुळे झिकाचा संसर्ग होतो.
झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने या डासांना झिका व्हायरसची लागण होते. झिकाची लागण झालेला हा डास इतर दुसऱ्या व्यक्तीला चावल्याने त्याला व्हायरसची लागण होते. तसेच झिका व्हायरसचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्त्रोतांसारख्या माध्यमांद्वारे होऊ शकतो.
लक्षणे
ताप,
डोकेदुखी,
स्नायू आणि सांधेदुखी,
शारीरिक अशक्तपणा,
डोळे लाल होणे,
डोळ्याची जळजळ होणे,
अंगावर पुरळ उठणे,
उलटी.
प्रतिबंध
झिका या व्हायरसचा संसर्ग रोखण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे.
झिका या व्हायरसचा संसर्ग एडीस प्रजातीच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साचलेल्या चांगल्या पाण्यात होते. त्यामुळे झिका संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या डासांची उत्पती रोखणे हा आहे.
डास चावणार नाही याची काळजी घ्यावी, मच्छरदाणी वापरावी.
तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत, कारण संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्याने देखील झिका व्हायरस पसरतो.