‘या’ घरगुती उपायांनी सर्दी-खोकल्यावर मिळेल त्वरित आराम

पावसाळी वातावरणामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. जाणून घ्या वातावरण बदलामुळे झालेल्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय –

हळदीचे दूध
हळद ही अँटी बॅक्टेरिअल असल्यामुळे ती सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. सर्दी, खोकला झाल्यास रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी दूधात हळद घालून पिल्यास त्वरित आराम पडतो.
एक ग्लास दुधामध्ये लसणाच्या दोन-चार पाकळ्या व थोडी हळद टाकून उकळवून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

गरम पाण्याची वाफ
गरम पाण्याची वाफ घ्या. सर्दी खोल्यामुळे श्वसन नलिकेत कफ जमा होतो तसेच घसा खवखवतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ कमी होण्यास मदत होते.

काढा
गवती चहा, आलं, लवंग, दालचिनी आणि काळीमिरी यांचा एकत्र काढा करुन पिल्यास सर्दी, खोकला कमी होतो.

गवती चहा
सर्दी, खोकला झाल्यास गवती चहा प्यावा.

आलं
दुधात किंवा गरम पाण्यात आलं बारीक करुन उकळवून पिल्याने सर्दी,खोकला कमी होण्यास मदत होते.
चहामध्ये आले घालून प्या. आले घशाचे इन्फेक्शन दूर करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply