मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जाणून घ्या हिंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

पोटाच्या तक्रारींवर गुणकारी
पोटात दुखत असल्यास चिमूटभर हिंग घेऊन ते पाण्यात मिसळून प्यावे. त्यामुळे पोटदुखी थांबते. तसेच हिंग पाण्यात भिजवून ते पोटाला लावल्याने आराम मिळतो.
पोटात गॅस झाला असल्यास ताकामध्ये हिंग मिसळून ताक प्यावे.
सकाळी रिकाम्या पोटी फक्त एक चिमूटभर हिंग खाल्ल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. सकाळी याचे सेवन केल्याने पचनक्रिया तर सुधारतेच पण अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील दूर होतात. हिंग तुमची पचनसंस्था चांगली करते.

डोकेदुखीवर गुणकारी
अनेकदा मायग्रेनचा त्रास होत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे सेवन करा. हिंगमध्ये जळजळ-विरोधी गुणधर्म असतात. हिंगाचे सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

कफावर गुणकारी
छातीत कफ झाला असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याचा लेप तयार करुन छातीला लावावा. यामुळे कफ विरघळण्यास मदत होते.

उचकी
उचकी लागल्यावर हिंगाचे सेवन केल्याने उचकी त्वरीत थांबण्यास मदत होते.

त्वचेच्या समस्या
डाग किंवा इतर त्वचेसंबंधित तक्रारी असल्यास पाण्यात हिंग मिसळून त्या जागेवर लावाल्यास डाग जाण्यास मदत होते.

टाचेच्या भेगा
टाचेला भेगा पडल्या असल्यास कडुलिंबाच्या तेलात हिंग मिसळवून त्याचा लेप पायाला लावल्यास भेगा भरुन निघण्यास मदत होते.

दातदुखी थांबते
दात दुखत असल्यास पाण्यामध्ये हिंग मिक्स करून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास दातदुखी थांबते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
यातील कोमरिन्स तत्त्वामुळे रक्त पातळ होऊन रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे उच्च रक्तदाबापासून बचाव होतो.

( टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.)