जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे महत्वाचे घटक असतात. जाणून घ्या जर्दाळू खाण्याचे फायदे
पचनसंस्थेचे कार्य सुधारते
जर्दाळू फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
डोळ्यांसाठी गुणकारी
जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारखी अनेक संयुगे असतात. ही संयुगे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. रातांधळेपणा रोखण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्वाची भूमिका बजावते.
त्वचेसाठी गुणकारी
जर्दाळूमधील व्हिटॅमिन ए आणि सी अतिनील किरणांपासून संरक्षण करून त्वचेला निरोगी बनवते.
रक्त गोठण्यास मदत करते
वाळलेल्या जर्दाळूंमध्ये व्हिटॅमिन के आढळते. व्हिटॅमिन के हे रक्त गोठवण्यासाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन के हे अधिकचा रक्तस्त्राव रोखण्यास मदत करते.
हृदयाचे आरोग्य सुधारते
जर्दाळूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी याची मदत होते. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
अशक्तपणा कमी करते
जर्दाळू हा लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. जर्दाळू लोह शोषण्यास मदत करतात. तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठीही याचा फायदा होतो. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.