लाकडी घाण्यावर अथवा उष्णता न देता तेल काढल्यामुळे तेलातील पोषणमुल्ये टिकून राहतात. यामुळे कोल्ड-प्रेस ऑईलची गुणवत्ता, चव आणि पौष्टिक मूल्यांचे संरक्षण होते. कोल्ड-प्रेस ऑईल रसायनांपासून मुक्त असून ते अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि लेसिथिनसह सर्व आवश्यक पोषक तत्वांनी युक्त असतात. कोल्ड प्रेसिंगमध्ये हे ऑईल्स उष्णतेचा वापर न करता प्रेशर देऊन काढले जाते. जाणून घ्या कोल्ड प्रेस्ड ऑईलचे फायदे –

शरीरासाठी आरोग्यदायी फायदे
कोल्ड-प्रेस ऑईल जेवणाला नैसर्गिक चव आणि सुगंध देते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

केसांच्या समस्येवर गुणकारी
कोल्ड प्रेस तेलाचा वापर तुम्ही केसांची निगा राखण्यासाठी देखील वापरू शकता. केसगळती, केसांत कोंडा होणे यांसारख्या समस्यांवर कोल्ड-प्रेस ऑईल प्रभावशाली आहे. तसेच केसांची वाढ होऊन केस मजबूत देखील बनतात.

त्वचेच्या आरोग्यसाठी फायदेशीर
कोल्ड-प्रेस ऑईल त्वचेला हायड्रेट, मॉइश्चरायझ ठेवते. तसेच त्वचेला नैसर्गिक चमक देखील मिळवून देते. त्वचेची वृद्धत्वाची समस्या कमी करते. त्वचा अधिक तरुण आणि निरोगी बनवते.