सफरचंद (Apple)
सफरचंद अल्कधर्मी मानले जातात आणि पोटातील अतिरिक्त ॲसिड निष्प्रभ करण्यास मदत करतात. त्यामध्ये पेक्टिन देखील असते, जे पोटातील ॲसिड शोषण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

नाशपाती (Pears)
नाशपातीमध्ये ॲसिडचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. नाशपातीमधील सोल्यूबल फायबर पोटातील अतिरिक्त ॲसिड शोषून घेण्यास मदत करते.

पपई (Papaya)
पपईमध्ये पपेनसारखे एन्झाईम असतात, जे पचनास मदत करतात आणि पोटातील प्रथिने ब्रेक डाऊन करण्यास मदत करतात. पपईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.

कलिंगड, टरबूज ((Melons – Watermelon)
कलिंगड, टरबूजांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे पोटातील ॲसिड पातळ करण्यास आणि पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करते. त्यामध्ये ॲसिडचे प्रमाणही कमी असते.

केळी (Bananas)
केळीमध्ये ॲसिडचे प्रमाण कमी असते आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. केळीत पेक्टिन, नावाचे एक सोल्यूबल फायबर देखील असते जे पोट आणि अन्ननलिकेच्या अस्तरांना आवरण देते. हे ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते.