केशर (Saffron) हा व्हिटॅमिन ए, लोह, फॉलिक ऍसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअमचा मोठा स्रोत आहे. खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे केशर एक उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे. केशरचे पाणी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर ठरते. जाणून घ्या केशरचे पाणी पिण्याचे फायदे आणि बनविण्याची पद्धत याविषयी माहिती –

केशरचे पाणी कसे बनवावे
२-३ केशरच्या काड्या घेऊन रात्रभर भिजत ठेवा व सकाळी या पाण्याचे सेवन करा.

पचनशक्ती सुधारते
केशरचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

कर्करोगापासून संरक्षण
केशरमध्ये क्रोसिन नावाचे तत्व असते जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोगापासून संरक्षण मिळते.

थकवा घालवते
दिवसभर थकवा जाणवत असेल तर केशरच्या पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीर ताजेतवाने वाटेल. उत्साही वाटेल.

त्वचेचे सौंदर्य खुलते
केशर पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार तसेच निरोगी राहील.

केस अधिक मजबूत आणि दाट बनतात
नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच केस अधिक मजबूत आणि दाट होतील.

टीप : वर दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इतर औषधे सुरु असतील तर वरील उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावेत.