गुलाबाच्या फुलाचा वापर सौंदर्यात भर घालण्यासाठी तसेच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतात. गुलाबाचे फुल केवळ सौंदर्यवर्धक नसून त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत…

अनिद्रेची समस्या दूर होते
गुलाबामुळे अनिद्रेची समस्या दूर होते. झोप येत नसेल तर, डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपा.

मुख दुर्गंधी दूर होते, हिरड्या आणि दात मजबूत बनतात
गुलाबाच्या फूलाच्या पाकळ्या खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. हिरड्या आणि दात मजबूत होतात.

डोकेदुखीवर प्रभावी
डोके दुखत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या बारीक करुन त्याचा लेप बनवून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.

शरीराला थंडावा देते
कांजण्या झालेल्या व्यक्तीच्या अंथरुणावर गुलाब पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या वाळवून बनवलेले चूर्ण टाका. त्यामुळे कांजण्या झालेल्या व्यक्तीच्या शरीराला थंडावा आणि अराम मिळेल.

डोळ्यांची जळजळ कमी करते
डोळ्यांची जळजळ होत असेल तर शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे गुलाबजल डोळ्यात घालावे डोळे थंड पडतात. गुलाबजल त्वचेच्या अनेक समस्यांवरदेखील गुणकारी आहे.

ओठांच्या समस्येवर फायदेशीर
ओठ फाटले असतील किंवा उकलले असतील तर गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यात ग्लिसरीन टाका आणि हे मिश्रण ओठांवर लावा. ओठ गुलाबी आणि मऊ होतील.

गुलकंदाचे अनेक फायदे
गुलाबपासून बनवलेला गुलकंद खाल्ल्याने वजन कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, पित्त, जळजळ, पोटदुखीच्या समस्यांवर आराम मिळतो, शरारीतील उष्णता कमी होते, स्मरणशक्तीसाठी वाढते, त्वचा मुलायम आणि तजेलदार बनते.