पारिजातक ही एक औषधी वनस्पती आहे. पारिजातक हा ‘प्राजक्त’ म्हणूनही ओळखला जातो. पारिजातकाच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. पारिजातकाची फुलंच नाही तर या झाडाच्या बिया, पाने, खोडही औषधी आहे. जाणून घ्या पारिजातकाचे औषधी गुणधर्म –

सांधेदुखी
सांधेदुखी कमी करण्यासाठी पारिजातकाचे ६ ते ७ पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडित इतर समस्या कमी होतील.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते
पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमाने प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

डेंग्यू
डेंग्यूमध्ये पारिजातकाची फुले पाण्यात उकळून त्याचा काढा घेतला जातो. पारिजातकाच्या फुलांमध्ये डेंग्यूमधील असह्य अंगदुखी दूर करण्याची क्षमता असते.

खोकला
पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो.

वेदनाशामक
हात, पाय आणि स्नायू ताणतात आणि दुखतात त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फरक होतो.

त्वचेसाठी गुणकारी
पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडित त्रास नाहीसे होतात. याचा फुलाची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो.

केसांसाठी गुणकारी
पारिजातच्या पानांचा रस पाण्यात मिसळून किंवा बियांची पेस्ट केसांच्या टाळूवर लावल्यास केस गळतीपासून आराम मिळतो.

टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.