पावसाळा सुरु झाला कि विविध संसर्गजन्य आजारांची साथ येते. सध्या डोळ्याच्या साथीच्या (Eye Infection)  रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. जाणून घ्या डोळे येणे म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय याविषयी सविस्तर माहिती –

पूर्वीही अनेकवेळा डोळे येण्याची साथ पसरायची. एका व्यक्तीच्या डोळ्यांचे इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला डोळ्यांना होऊन साथ पसरते. डोळ्यांचा हा संसर्ग ४-५ दिवस राहतो. या आजाराविषयी अनेक गैरसमज देखील प्रचलित आहेत. डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्याने आपल्याही डोळ्यांना इन्फेक्शन होते, एकदा डोळे येऊन गेल्यास परत येणार नाही असे अनेक चुकीचे समज अजूनही लोकांच्या मनात आहे.

डोळे येण्याची कारणे

डोळे येण्याचे बहुतांशी कारण व्हायरस किंवा बॅक्टरीयामुळे हेच असते. मात्र काही वेळा रासायनिक पदार्थ, प्रखर प्रकाशकिरण, ऍलर्जी यामुळेही डोळे येतात. सर्दी झाल्यास देखील डोळे येऊ शकतात.

डोळे आल्याची लक्षणे

डोळे आल्यानंतर डोळे लालसर दिसतात.
डोळ्यांना खाज येते, डोळे जळजळतात.
डोळ्यांना उजेड सहन होत नाही.
डोळ्यांच्या आतील ग्रंथींना सूज येते.
डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे दुखू लागते.
डोळ्यांतून सतत चिकट पाणी वाहते.
सर्वात महत्वाचे म्हणजे झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटून बसतात. यामुळे खूप त्रास जाणवतो.
काहींना तर घसा दुखणे, सर्दी, ताप या देखील समस्या उद्भवतात.

डोळे आल्यानंतर काय काळजी घ्यावी

डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने गॉगल वापरावा.
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींनी डोळे कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ करावेत.
डोळे चोळू नयेत.
डोळे हातांनी न पुसता स्वच्छ रुमालाने पुसावेत.
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू हाताळू नये. उदा. कपडे, रुमाल, गॉगल, मोबाईल, आयड्रॉप्स
डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने इन्फेक्शन बरे होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये मिसळणे टाळावे.

घरगुती उपाय

हळद
हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडं औषधी गुणधर्म डोळ्यांच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात. अर्धा चमचा हळद पावडर थोड्या कोमट पाण्यात मिसळा. नंतर हळदीच्या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांना लावा. यामुळे डोळ्यांमधील घाण निघून जाईल. डोळा सलणे, वेदना आणि जळजळीपासून आराम मिळेल.

मध
त्यानंतर या मधाच्या पाण्याने डोळे धुवा. डोळ्यातील जळजळ आणि वेदना मधाच्या पाण्याने लवकर दूर होतील. मध हा डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी मदतशीर ठरू शकतो. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.

गुलाबपाणी
गुलाबपाणी डोळ्यांच्या फ्लूमुळे होणारी समस्या कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाका. गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते.

बटाटा
बटाट्याचे गोल काप करून ते डोळ्यांवर ठेवा. बटाट्याचे तुकडे 10-15 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या. बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.

कापूर
डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

ग्रीन टी
ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.

टीप – वरील घरगुती उपाय सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. वरील उपायाचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.