आजकाल लॅपटॉप, मोबाईल आणि गॅजेट्सच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. कमी वयातच दृष्टी कमी होऊ लागली आहे. मात्र काही पदार्थांचे सेवन केल्याने दृष्टी वाढते. जाणून घ्या दृष्टी सुधारण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत –

केळ Banana
केळाचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते. केळामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी व के मुबलक प्रमाणात असते. हे घटक डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

गाजर Carrot
चांगल्या दृष्टीसाठी, विशेषतः रात्री नीट दिसावे यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक असते. गाजर हे बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते.

रताळं Sweet potatoes
रताळं नियमित खाल्ल्याने दृष्टी सुधारते. रताळं हे देखील बीटा-कॅरोटीनचा आणखी एक उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक देखील असते. रताळ्यामध्ये असलेलं बीटा कॅरेटीन हे डोळ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तसचं कमी दृष्टी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

पालक spinach
मॅक्युला हा डोळ्याचा एक असा भाग आहे जो सेंट्रल व्हिजनसाठी किंवा दृष्टीसाठी जबाबदार असतो. पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मोठ्या प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट्स मॅक्युलाचे संरक्षण करण्यास मदत करतात. आहारात पालक पासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

बदाम Almonds
बदामामध्ये असलेल्या विटामिन ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे डोळ्यांची जळजळ कमी होते तसचं नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते.

अंड Egg
अंड्यामध्ये प्रोटीन, झिंक ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे कॅरोटीनोइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे घटक असतात. यामुळे हानिकारक किरणांपासून तसचं प्रकाशापासून डोळ्याचं होणारं नुकसान टाळता येतं. तसंच डोळ्यांच्या स्नायूंचं देखील रक्षण होते.

संत्र Orange
मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे दृष्टी सुधारते.