झिंक हा एक महत्वाचा घटक आहे. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी झिंक खूप चांगले आहे.शरीरात झिंकची कमतरता असेल तर भूक कमी लागणे, वजन कमी होणे, प्रतिकार शक्ती कमजोर होणे, केस गळणे, जखम लवकर बरी न होणे, डोळ्यांच्या समस्या, त्वचेच्या समस्या अशा अनेक समस्या जाणवतात. शरीराला झिंक मिळवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करावा. जाणून घ्या झिंकयुक्त पदार्थ –

अंडी
शरीरात झिंकची कमतरता असेल तर तुम्ही अंड्याचे पिवळे बलकदेखील शिजवून खायला हवे. कारण यामध्ये झिंकसोबत कॅल्शिअम, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, व्हिटॅमिन बी 12, लोह, फॉस्फरस यासोबतच झिंकही भरपूर प्रमाणात मिळते.

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक असतं. भोपळ्याच्या बिया खाण्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळते. भोपळ्याच्या बिया खाण्यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात.

शेंगदाणे
शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या शरीराला झिंकचा पूरवठा तर होतोच शिवाय लोह, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम,फायबर्सही मिळते. शेंगदाण्यात सुमारे 50 टक्के पौष्टीक चरबी असते, जी कोणत्याही इतर पदार्थांपेक्षा अधिक कॅलरी देते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते.

तीळ
शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर मानले जाते. तिळामध्ये झिंक बरोबरच पॉलिसॅच्युरेटेड ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात.

मासे
मास्यांमध्ये झिंकही मुबलक प्रमाणात असते.मासे फॅटी ॲसिड आणि ओमेगा -2 याचा खूप चांगला स्रोत आहे हे सर्वांना माहित आहे. मासे खाल्ल्याने त्वचा ही खूप निरोगी होते.