पावसात भिजल्यामुळे किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे, फंगल इन्फेक्शन होते. यामुळे अनेक त्वचेचे आजारही होऊ शकतात. यावर अँटीफंगल पावडर वापरणे हा एक उपाय आहे. पावसाळ्यात अँटीफंगल पावडर वापरण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या अँटीफंगल पावडर वापरण्याचे फायदे –

त्वचेच्या समस्या
खाज सुटणे, लालसरपणा किंवा बुरशीजन्य संसर्ग अशा समस्या असतील तर अँटीफंगल पावडरचा वापर करावा.

त्वचा कोरडी राहते
अँटीफंगल पावडरमध्ये बरेचदा असे घटक असतात जे त्वचेतील अतिरीक्त ओलावा आणि घाम शोषण्यास मदत करतात.

बुरशीजन्य आजार रोखते
ओलावा आणि घाम साचण्याची शक्यता असलेल्या भागात अँटीफंगल पावडर लावली पाहिजे. त्वचेवर बुरशीची वाढ रोखण्यासाठी अँटीफंगल पावडर उपयोगी आहे. त्वचा कोरडी ठेवून, अँटीफंगल पावडर बुरशीच्या वाढीसाठी प्रतिकूल वातावरण तयार करते.

त्वचेला थंडावा देते
अँटीफंगल पावडरमध्ये मेन्थॉल किंवा कोरफड सारखे घटक असतात. हे त्वचेला थंडावा देतात.

संसर्ग, दुर्गंध रोखते
आणि ओलसर वातावरणामुळे यामुळे येणारा दुर्गंध अँटीफंगल पावडर रोखते.

टीप – सर्वसामान्य त्वचेसाठी, सामान्य त्वचेच्या समस्यांसाठी अँटीफंगल पावडर उपयोगी आहे, मात्र अँटीफंगल पावडर सर्व प्रकारच्या त्वचेच्या समस्यांसाठी प्रभावी असू शकत नाही. त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात असतील तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.