सकाळी नाश्ता न केल्याने दिवसभर सुस्ती येते. थकवा, स्थूलपणा वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

सकाळी नाश्ता न केल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

सकाळी नाश्ता न केल्याने ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहते. त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, मायग्रेनसारखा त्रास जाणवू शकतो.

सकाळी नाश्ता न केल्याने शरीरात मेटॅबॉलिझमचे कार्य बिघडते. परिणामी कॅलरी बर्न होण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.