निरोगी आरोग्यासाठी रोज रात्री किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. केवळ जीवनशैलीतील बदलांमुळेच नाही तर आहारातील बदलांमुळेही झोपेवर परिणाम होतात. परंतु, झोपेसंबंधित आजारापासून तुम्हाला दूर राहायचे असेल तर रोज रात्री मूठभर पिस्ता (Pistachios) खाल्यास त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. काय आहेत हे फायदे आपण जाणून घेऊ..

पिस्ता हा शांत झोपेसाठी एक सर्वोत्तम पदार्थ ठरला आहे. पिस्त्यामध्ये मेलाटोनिनचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे शांत व गुणवत्तापूर्ण झोप लागण्यासाठी मदत होते.

पिस्त्यामुळे शरीराला मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 मिळते. त्यामुळे गामा, ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिनचे उत्पादन सुलभ करते. सेरोटोनिनचे उत्पादन ट्रायप्टोफॅन या अमिनो आम्लावर अवलंबून असते. आयुर्वेदानुसार पिस्त्यामध्ये वात-शमक गुण असतो, ज्यामुळे चिंताग्रस्त, निद्रानाश, लठ्ठपणा दूर राहण्यास मदत होते. शिवाय पिस्ता ह्रदयविकारावरही चांगला असतो.

पिस्त्यामुळे शांत झोप लागते, झोपेची गुणवत्ता सुधारते, शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक आरोग्य उत्तम राहते.