दुधासोबत काही पदार्थ खाल्ल्याने बालकांवर त्याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. कोणते आहेत हे पदार्थ आपण जाणून माहिती जाणून घ्या –
दूध आणि खारट पदार्थ
पालकांनी आपल्या मुलांना दूधसोबत चिप्स, वेफर्स आणि इतर खारट स्नॅक्स देणे टाळावे. हे खारट पदार्थ दूधासोबत खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी, एक ग्लास पाणी किंवा फळं, भाज्या यांसारखा निरोगी नाश्ता दिलेला उत्तम.
दूध आणि आंबट फळे
लहान मुलांना दूधासोबत आंबट फळं, आंबट पदार्थ खायला देऊ नये. मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दूधातील प्रथिने जमा होतात आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, पोटात दुखणे, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात.
दूध आणि द्राक्षे
मुलांना द्राक्ष खायला दिल्यानंतर तासभर दूध पिणे टाळा. दुधात असलेले प्रोटीन द्राक्षांच्या आम्लयुक्त स्वभावाच्या आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन सीच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यावर आंबते. या संयोगामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, शारीरिक अस्वस्थता, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.
दूध आणि खरबूज
दूध आणि खरबूज एकत्र केल्याने त्यातील ऍसिड आणि दुधातील प्रोटीन एकत्र येतात. यामुळे दूध आंबू शकते. जेव्हा हे मिश्रण तुम्ही एकत्र खाता तेव्हा पचनसंस्था आणि इतर समस्या उ्द्भवू शकतात.