उसाच्या रसातून मोलॅसिस हा घटक बाजूला काढून त्यानंतर ब्राऊन शुगर तयार करतात. ब्राऊन शुगरला नैसर्गिक रंग आणि सुगंध असतो. त्यामुळे त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. ब्राऊन शुगर मासिक पाळीच्या वेदनांवरही उपायकारक आहे. शिवाय या शुगरमुळे त्वचेतील हायड्रेशन वाढण्यास मदत होते. ब्राऊन शुगर सेवन करण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्हाला अनेक जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. जाणून घेऊयात… (brown sugar benefits) ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे –
– ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
– ब्राऊन शुगर मिसळून आल्याचा चहा केल्यास शरीराला फायदा होतो.
– श्वसनाचा त्रासही या शुगरमुळे नियंत्रणात राहू शकतो.
– गर्भवती महिलांची ओटीपोट आणि पाठदुखी यामुळे कमी होण्यास मदत होते.
– यातील व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिडसारखे घटक त्वचा निरोगी ठेवतात.
– या शुगरमध्ये कॅलरीज कमी असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
– ब्राऊन शुगरमधील अँटी-एलर्जिक गुणधर्म दम्याची लक्षणे कमी करतात.