बदलते ऋतुमान, थंड किंवा आंबट खाण्यामुळे घसा खवखवण्याचा त्रास होतो. घसा खवखवण्यामुळे घश्याला सूज येणे, घसा दुखणे, कोणताही पदार्थ गिळताना घसा दुखणे, स्वरयंत्राला सूज येणे असे त्रास जाणवतात. जाणून घेऊया घसा खवखवण्यावर घरगुती उपाय –
हळदीचे दूध पिणे
गरम दूधात एक चमचा हळद घालून पिल्याने देखील घशाची खवखव कमी होते. दूध पिल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये.
मध
घसा खवखवत असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखीपासून आराम देतात.
कोमट पाणी प्यावे
घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्याने घशाची खवखव कमी होते.
लसूण
कच्चा लसूण खाल्ल्याने देखील घशाची खवखव कमी होते.
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घशातील बॅक्टेरियांचा नाश होण्यास मदत होते. घश्याची खवखव तात्काळ कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. यामुळे घश्याचे दुखणे आणि सूज दोन्ही कमी होतं.
आले
आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. ५ मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्या. यामुळे देखील घशाची खवखव कमी होते. आल्याचा चहा पिल्याने देखील घश्याची खवखव कमी होण्यास मदत होते.