पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा. उन्हाळ्यात ताडगोळ्यांना खूप मागणी असते. ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे –

उष्णता कमी होते
निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची कमतरता ताडगोळ्यांमुळे भरुन निघते.

उन्हाळी कमी होते
उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो.

किडनीचे आरोग्य सुधारते
शरीरातील नको असलेली द्रव्ये याच्या सेवनानं शरीराबाहेर फेकली जातात.

कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते
कांजण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.

त्वचेसाठी गुणकारी
ताडगोळ्यांच्या सेवनाने त्वचाविकार कमी होतात.
ताडगोळ्यांपासून फेसपॅकही चांगला बनवता येतो. त्यासाठी चंदन उगाळून घ्यावं. त्यात थोडं नारळपाणी आणि ताडगोळा कुस्करून घालावा. याचा तयार झालेला फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावावा.

चेहऱ्याची जळजळ कमी होते
उन्हात जाऊन आल्यानंतर जर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचं पाणी व ताडगोळा चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा पुसून घ्यावा.

इम्युनिटी सिस्टिम मजबूत होते
ताडगोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता
ताडगोळ्यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.