अंडी(eggs)
अंडी फ्रीजरमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. यामुळे अंडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.अंडी फ्रीजरमध्ये ठेवल्यास त्यात पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे बाहेरच्या कवचाला तडे जाऊ शकतात. अंडी फ्रीजरमध्ये ठेवायची असतील तर ती फेटून हवाबंद डब्यात ठेवू शकता.

बटाटे(potatoes)
कधीही बटाटे फ्रीजरमध्ये ठेऊ नका. फ्रीजरमध्ये बटाटे ठेवल्यामुळे बटाट्यांना कोंब फुटतात आणि बटाटे खराब होतात.

फळे( fruits)
तसेच फळे देखील फ्रीजरमध्ये ठेवू नयेत. फळे फ्रीजरमध्ये ठेवली की ती आतून सुकतात ज्यामुळे त्यांच्या चवीवर परिणाम होतो. फळे फ्रीजरमध्ये ठेवण्यानं त्यातली पौष्टिकता नष्ट होते.

सॉस(sos)
टोमॅटो केचप, सोया सॉस आणि अन्य सॉस फ्रीजरमध्ये ठेवल्यास त्याचा पोत आणि चव खराब होते.

कॉफी (coffee)
कॉफी देखील फ्रीजरमध्येठेवू नये. थंड वातावरणात कॉफी ओलसर होऊन गोळा होते. तिची चव आणि वास बदलतो.

लसूण(garlic)
लसूण किंवा लसणाच्या पाकळ्यांना कधीही फ्रीजर मध्ये ठेवू नये. कारण अति थंडीने लसूण नरम पडतो.

मध(honey)
मधाचा थंड वातावरणात पोत बदलतो. मध नेहमी सर्वसाधारण तापमानात ठेवावे.

दूध(milk)
दूध फ्रीजरमध्ये ठेवू नका. दूध फ्रीजरमध्ये ठेवल्यावर सोडा किंवा बिअरप्रमाणे फसफसतं. दूध गोठल्याने त्याची रचना मोठ्या प्रमाणात बदलू शकते, ते चिकट होऊ शकते.

काकडी (cucumber)
काकडी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तिची चव बदलते. त्यामुळे कधीही काकडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.

ब्रेड, पाव(bread)
ब्रेड, पाव हे पदार्थ देखील फ्रिजरमध्ये ठेवू नयेत. अतिशय थंड वातावरणात ब्रेड कोरडा होतो नि कडक होतो. त्यामुळे त्याची चव बिघडते. तसेच पचायलाही जड जातो.