माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : गुळ (jaggery) आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आणि गुणकारी मानला जातो. हाच गूळ तुम्ही कोमट पाण्यात मिसळून पिल्यास तुमचे वजन कमी करण्यासही तुम्हाला फायदा होईल. कसे ते आपण जाणून घेऊयात..
दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर दात न घासता 1 किंवा 2 ग्लास गूळ मिसळलेले कोमट पाणी प्यावे. गुळामुळे दिवसभराच्या कामांसाठी ऊर्जा मिळते. तसेच गुळामुळे शरीराला लोह, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, फोलेट, पोटॅशियम, सोडियम, कॉपर पण मिळेल. यामुळे शरीरातील अतिरिक्त मेद कमी होण्यास सुरुवात होईल आणि चरबी वितळण्यास सुरुवात होईल. वजन कमी होण्यास सुरुवात झाल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहिलं.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
गूळ मिसळलेले कोमट पाणी पिण्याचे फायदे –
लोहाची कमतरता दूर होते : गुळामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते. शिवाय रक्तशुद्धीसाठी गूळ आवश्यक आहे. शरीरातील लाल रक्तपेशींची संख्याही यामुळे वाढते.
हाडे मजबूत होतात : झिंक, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर याची शरीरातील कमतरता गुळामुळे दूर होते. यामुळे हाडे मजबूत होतात.
इम्युनिटी बूस्टर : गुळाचे पाणी पिल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. गुळामध्ये व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट ही मोठ्या प्रमाणात असतात.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
रक्त शुद्ध राहते : गुळाचे पाणी पिल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात. यामुळे रक्त शुद्ध राहते. त्वचा तजेलदार होते. शिवाय शरीर अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)