माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक गुड आणि एक बॅड. बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असते. हे बॅड कोलेस्ट्रॉल आपण घरगुती उपाय करून नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो. त्यासाठी आवळा, लसूण आणि लाल यिस्ट तांदूळ तुम्हाला फायदेशीर ठरतील. काय आहेत याचे फायदे आपण जाणून घेऊ….(cholesterol)
बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याचे मुख्या कारण आहार. तज्ज्ञांच्या मते, आहारात बदल करून बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
आवळा
आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. त्यासाठी तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारे आवळा खाऊ शकता. आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो, त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. आवळा पावडर पाण्यात घालूनही तुम्ही पिऊ शकतात. त्यामुळे रक्तातून चरबी काढून पातळ करण्याचे काम कारण्यासोबतच शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे.
लाल यीस्ट तांदूळ
सामान्य पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल यीस्ट तांदूळ म्हणजेच रेड ईस्ट राईस शरीरासाठी अत्यंत खूप फायदेशीर आहे. या तांदळामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
लसूण
आवळ्याशिवाय तुम्ही घरातील लसणाचा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करू शकतात. लसणाचे सेवन उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये अत्यंत फायदेशीर आहे. लसूण रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. शिवाय यामुळे शरीरातील गुड कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)