तुम्हाला माहिती आहे का अवेळी खाल्ल्याने, अयोग्य खाणं आणि पिणं, बदलती जीवनशैली यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. तसेच पोटदुखीची विविध कारणे असू शकतात. तुम्हालाही जर पोटदुखीची समस्या उद्भवत असेल तर हे उपाय करून पाहा. यामुळे नक्कीच फरक पडण्यास मदत होईल.

* आल्याचा रस पोटदुखीमध्ये गुणकारी आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा चघळा किंवा चावून खा. जसजसा आल्याचा रस पोटात जाईल तसतसं पोट दुखणं कमी होईल.

* मुळ्याचा रसानेही पोटदुखी कमी होते. याशिवाय या रसात काळी मिरी आणि थोडंसं मिठ टाकूनही घेऊ शकता. यामुळे पोदुखीत अराम मिळतो.

* पोट दुखीवर जिऱ्याचं पाणीही खूप फायद्याचं आहे. जीरं कोमट पाण्यात टाका. नंतर ते पाणी प्या.

* हिंगेची गोळी वा हिंग पावडर पाण्यात उकळून घ्या. नंतर ते नाभीवर ठेवा. यामुळे पोट दुखण्याचा त्रास कमी होईल.

टीप- पोट विविध कारणांनी दुखते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूपच पोट दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच इतर कोणत्या आजारामुळे पोटात दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.