माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सध्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अत्यंत लहान वयातच केसगळती होणे, केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेक तरुणांचे केस पांढरे झाल्याचे किंवा त्यांना टक्कल पडल्याचे तुम्ही पाहिले असेल किंवा तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल. मात्र, या समस्येवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुमची ही केसाची समस्या लवकर दूर होईल. कोणते आहेत ते सोप्पे उपाय आपण जाणून घेऊयात… (Home Remedies For Hair Growth )

केस गळण्याची कारणे…
असंतुलित आहार, तणाव, हार्मोनल असंतुलन यामुळे अनेकांना केस गळण्याची समस्या उद्भवते. मात्र, यावरील काही उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी काही घरगुती उपाय आपण पाहूयात ज्यामुळे तुमचे केस लांब आणि दाट होतील.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

कोरफड
कोरफड केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस वेगाने वाढतात. कोरफडीत अनेक एन्झाइम असतात, जे टाळूच्या पेशींना पोषण देते. तसेच केसांचे संरक्षणही करतात. यासाठी एक कप कोरफडीचा गर कपात घेऊन त्यात दोन चमचे शुद्ध मध टाकून एकजीव करा. ही पेस्ट केसांवर, टाळूवर नीट लावा आणि अर्धातासाने केस पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा ते दोनदा हा उपाय केलास फायदा होईल.

खोबरेल तेल
खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. त्यासाठी कोमट खोबरेल तेल आपल्या टाळू आणि केसांना लावा. 1-2 तास तेल तसेच ठेवून नंतर शॅम्पूने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्यास अधिक फायदा मिळेल.

हे ही वाचा ः  शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

मेहंदी
एक अंडे मेहंदीत मिसळून हे मिश्रण आठवड्यातून एक ते 2 वेळा केसांना लावू शकता. अंड्यामध्ये प्रोटीन असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. दुसरीकडे, केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदी खूप फायदेशीर आहे.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)