डोक्यावरील काही भागातील केस गळून पडून ते पुन्हा न उगवल्यामुळे तेथे टकलासारखा तुळतुळीत भाग दिसतो त्याला चाई म्हणतात. चाई काही वेळा आनुवंशिक असते, तर काही वेळा अँड्रोजेन या हॉर्मोनामुळे होते.
अनेकांना केसांना चाई पडण्याची समस्या जाणवते. तसेच चाई फक्त डोक्यातच नाही तर भुवयांचे केस, दाढीचे केस येथेही पडते. हा आजार आपोआप बरा होणारा असतो. परंतू त्यासाठी काही कालावधी लागतो. यावर काही घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत. ते तुम्ही ट्राय करू शकता.
*लसूण, कांदा, आले, लिंबू रस-
एक चमचा कांद्याचा रस घ्या. एक चमचा लसणाचा रस घ्या. एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्वांचे एकत्र मिश्रण करा आणि चाई पडलेल्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी लावा. महत्त्वाचं म्हणजे सकाळी केलेला रस संध्याकाळी लावू नका. प्रत्येक वेळेस ताजे मिश्रण तयार करा आणि लावा.
*मोहरी व खोबरेल तेल-
मोहरी बारीक वाटून घ्या. त्यात खोबरेल तेल मिसळा. नंतर एक दिवस हे मिश्रण भिजत राहू द्या. नंतर रोज सकाळ आणि संध्याकाळ हे मिश्रण चाई पडली आहे तिथे लावा. यामुळे लवकर केस उगवतील.
*जास्वंदाची पाने व फुले-
तुमच्याकडे जर पांढऱ्या जास्वंदाची फुले आणि पाने असतील तर त्याचा रस काढा. तो डोक्याला लावा. तसेच जास्वंदीच्या फुलाचे लहान-लहान तुकडे करा. त्यात खाण्याचा सोडा टाकून बारीक पेस्ट करा. नंतर चाई पडलेल्या ठिकाणी लावा.
*गुंजा बी-
गुंजा बी उगाळून चाई पडलेल्या ठिकाणी तीन दिवस लावा. यामुळे चाई पडलेल्या ठिकाणी लवकर केस उगवण्यास मदत होते.
*जमालगोटा बी-
जमालगोटा बी उकळा. नंतर ते चाई पडलेल्या ठिकाणी तीन दिवस लावा. यामुळे लवकर केस येण्यास मदत होते.