माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : निरोगी आरोग्यासाठी खजुरचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. शिवाय यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटकही असतात. खजूर खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात आपण पाहूयात..(khajur)
– कोलेस्ट्रॉल
खजुराचे दररोज सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण घटून कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर उत्तम उपाय आहे.
– मानसिक आरोग्य
दररोज खजूर खाल्ल्याने मेंदूचा विकास होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. शिवाय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते. त्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
– हृदय विकार
खजूर हृदय मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यातील पोषक घटकांमुळे हृदय मजबूत आणि निरोगी बनते. शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे हृदय विकारासारख्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.
– थकवा दूर होतो
खजूरातील पौष्टिक घटक शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी करतात. खजुराच्या रोजच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.
– बद्धकोष्ठतेपासून आराम
खजूर खाल्ल्याने केवळ बद्धकोष्ठताच नाही तर अपचन, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात. पोटाच्या समस्येवर खजूर अत्यंत गुणकारी औषध मानले जाते.
हे ही वाचा ः पुणेकरांनो सावधान, राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात; गेल्या २४ तासात आढळले नवे १३६ रूग्ण
खजूराचे अन्य फायदे
रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत
वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
मूळव्याधासारख्या विकारांवर गुणकारी
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)