माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : आपल्या आहारात चटण्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात अनेक प्रकारच्या चटण्या बनविल्या जातात. त्यातील एक आहे पुदिन्याची चटणी (Mint Chutney). बाहेरील सॉस खाण्याच्या तुलनेत घरी तयार करण्यात आलेल्या चटण्या, लोणची आरोग्यासाठी चांगली. पॅकिंग केलेल्या सॉसमध्ये फॅट्स, साखर, मीठाचे प्रमाण अधिक असते. त्या तुलनेत घरी तयार करण्यात आलेली पुदिन्याची चटणी चवीलाही उत्तम आणि निरोगी असते. (Mint Chutney Health Benefits in summer season)
हे ही वाचा ः पुणेकरांनो सावधान, राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात; गेल्या २४ तासात आढळले नवे १३६ रूग्ण
पुदिन्याच्या चटणीचे फायदे
– पुदिन्याच्या चटणीचा आहारात समावेश केल्यास जेवणानंतर होणारी अपचनाची समस्या दूर होते. पुदिन्यात फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने असते. अपचनामुळे पोटात तयार होणारा वायू कमी होतो.
– उन्हाळ्यात अनेकांना जळजळीचा त्रास होतो. त्यावर पुदिना गुणकारी असून शरीर हायड्रेटेड राहण्यास पुदिन्यामुळे मदत होतो.
– पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास आतड्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
– पुदिन्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते, जे मुरुम आणि चेहऱ्यावर पडणारे डागांचे प्रमाण कमी करते. शिवाय यामुळे त्वचेच्या समस्या कमी करते.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
पुदिन्याची चटणी कशी बनवावी
– पुदिन्याची ताजी पाने, कोथिंबीर, आले, लसून याचा वापर करून पुदिन्याची चटणी तयार केली जाते. हे पदार्थ एकत्र केल्यावर त्यात लिंबाचा रस टाकला जातो. उन्हाळ्यात यात कैरीही वापरली जाते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)