पुणे : हाय होल्टेजच्या वायरने रूमला लागून या आगीत एका १० वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शुभ्रा ओहाळ (वय १०) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत शुभ्रा हिचे वडिल गणेश ओहाळ यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रूम मालक खडकी पोलीस ठाण्यात महेमुद्दीन मगदुम (रा. बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओहाळ कुटूंब भाड्याने रूम घेऊन राहत होते. त्यांनी महेमुद्दीन यांच्याकडून रूम भाड्यावर घेतली होती. दरम्यान, महेमुद्दीन यांनी त्यांच्या घरावरून हाय होल्टेज केबल गेलेली असताना देखील आर्थिक फायद्यासाठी वन प्लस वन अशी बांधून ती भाड्याने दिली. येथे ओहाळ कुटूंब राहत होते. रूमच्या छताजवळून केबल गेल्याने अचानक १५ मार्च रोजीच हाय होल्टेज केबलमुळे रूमला आग लागली. त्यावेळी शुभ्रा रूममध्ये होती. आगीत गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर घटना १५ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. मात्र याविषयी पोलिसांकडे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.