गुढीपाडव्याला गुढी उभारताना साखरेची गाठी ही लागतेच. चवीला सुंदर लागणारी साखरगाठी बनवायलाही सोपी आहे. जाणून घ्या साखरगाठी बनविण्याची सोपी पद्धत –

साहित्य
दोन वाट्या साखर, लिंबाचा रस, चिमूटभर सोडा, पांढरा स्वच्छ दोरा, साचा (मोल्ड)

गाठी बनविण्याची पद्धती

एका भांड्यात साखर घ्या. त्यामध्ये साखर बुडेल इतकेच पाणी टाका. सादर मिश्रण गॅसवर ठेवून गॅस चालू करा. चमच्याने हलवून साखर विरघळवा.
साखर विरघळली की त्यामध्ये लिंबाचा रस घाला. त्यानंतर गॅस बंद करुन त्यामध्ये इनो घाला.
एकतारी साखरेचा पाक तयार झाल्यानंतर दोरा ठेवून साच्यामध्ये साखरेचे लिक्विड घाला. सुकल्यानंतर साखरगाठी तयार होईल.