माझं आरोग्य टीम (Mazarogya Team) : सध्या नाटू नाटू (Nattu Nattu Song) हे दक्षिणात्य चित्रपटातील (south indian movie) गाणे अत्यंत प्रसिद्ध झाले आहे. हे गाणे कित्येकांना आपल्या तालावर पाय थिरकायला भाग पाडते. खरंतर नृत्य केल्याने माणूस तणावमुक्तीचा अनुभव मिळवतो. जर तुम्हीही दररोज केवळ काही अर्धातास नृत्य केले तरी त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन तुम्ही अनेक मानसिक आजारांपासून दूर राहू शकतात. नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे आपण पाहूयात… (dance release stress on mind)
अनेक जण रोज झुम्बा, (Zumba) एरोबिक नृत्य (Arobic dance), टँगो नृत्य (tango dance) करतात. या नृत्य खरंतर अत्यंत प्रभावी व्यायाम असून त्यातून दिवसभर उत्साह, चैतन्य मिळण्यास नक्कीच मदत होते. याशिवाय तणावातून मुक्त होण्यासाठी कोणतेही नृत्य केले तरी त्याचा फायदाच होतो. अशा प्रकारे दिवसातून किमान अर्धातास जरी नृत्य केले तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय अनेकांना चरबी कमी करायची असते. त्यामुळे नृत्य केल्याने चरबी, जाडी देखील कमी होते.
धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी
टॅंगो नृत्य (benefit of tango dance)
टँगो नावाचे नृत्य असून हे नृत्य केल्याने प्रौढांमधील शरीराचे संतुलित साधण्यास मदत होते. जर्नल ऑफ एजिंग अॅण्ड फिजिकल अॅक्टिव्हीटीने आपल्या संशोधन ही बाब नमूद केली आहे. वाढत्या वयामुळे व्यक्तीचा तोल जाण्याची भीती असते, अशा वेळी या नृत्याचा आधार घेता येऊ शकतो. नृत्य केल्याने शरीर लवचिक होऊन शरीरावर नियंत्रण ठेवता येते.
एरोबिक नृत्य (benefit of arobic dance)
या नृत्यामुळे माणसाची स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत होते. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका अहवालातून ही बाब पुढे आली. या नृत्यातील स्टेप्स आणि हालचाली लक्षात ठेवल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय
नृत्याचे फायदे (benefit of dance)
– नृत्यामुळे हृदय बळकट होण्यास मदत होते
– शरीराचा व्यायाम होऊन आरोग्य निरोगी राहते
– मन उत्साही राहते
– श्वासोच्छास सुधारतो
तणाव दूर होण्यास मदत
नृत्य केल्याने दिवसभरातील तणाव कमी होऊन मन प्रफुल्लित होऊन उत्साह वाढतो. दररोज नृत्य केल्यास नैराश्यातून बाहेर पडण्यासही त्याचा फायदा होतो, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)