मकर संक्रातीचा सण नुकताच साजरा झाला. या सणाला तीळाचा लाडू बनवले जातात. तीळाचे लाडू खाण्याचे शरीराला खूप फायदे होतात. कारण यात अनेक जीवनसत्वे असतात. शिवाय हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात.
चला तर मग जाणून घेऊ तीळाचे लाडू खाण्याचे फायदे-


– तीळाचे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारकर शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून आपले संरक्षण होते.

– तीळात खूप कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही.


– तुम्हाला जर बद्धकोष्ठतासारखे पोटाचे आजार असतील तर तीळाचे लाडू खावेत. तसेच तुम्ही तीळही खाऊ शकता.

– दम्याच्या रुग्णांसाठीही तीळाचे लाडू खूप फायदेशीर ठरतात.

– हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तीळाचे लाडू खाल्ले पाहिजे.