पेरू खायला सर्वांना आवडतो. पेरू खाण्याचे शरीराला खूप फायदेही आहेत. पेरू खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते हे तुम्हाला माहिती आहे का?


– पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्यासाठी पेरूला मीठ लावून खा. पेरूमध्ये फायबर खूप असते.


– ज्या लोकांना डायबेटिसचा त्रास आहे अशा लोकांनी पेरूचे सेवन करावे. पेरूमध्ये फायबर आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे डायबेटिस रोखण्यास मदत होते. पेरूला काळे मीठ लावून खा.


– ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्या लोकांनीही पेरूचे सेवन करावे. पेरूत फायबर अधिक असल्याने मेटाबोलिक रेट वाढून बेली फॅट कमी होते.


– सर्दी खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी पेरू खावेत. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे सर्दी, खोकला बरा होण्यास मदत होते.


– पेरू खाल्ल्याने आपल्या डोळ्याची दृष्टी वाढते. तसेच मोतीबिंदूची समस्याही दूर होते.