आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा पायांवर असतो. परंतु आपण त्या पायाची किती काळजी घेतो. त्याकडे आपण सतत दुर्लक्ष करतो. असे करणे योग्य नाही. त्यासाठी दररोज तळपायाची मालिश केली पाहिजे. असे केल्याने आपल्या शरीराल खूप फायदे होतात. हे फायदे वाचून तुम्हीही रोज तळपायाची मालिश करायला सुरूवात कराल.

– रोज तळपायाची मालिश केली तर डोळ्यांच्या संबंधित तक्रारी दूर होतील. त्यामुळे नजर चांगली होईल.

– ज्या लोकांना वाताची समस्या आहे अशा लोकांनी तर रोज तळपायाची मालिश करावी. तळपायाची मालिश केल्याने या समस्येपासून तुमची सुटका होईल.

– तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा ताण येत असेल तर तळपायाची मालिश करा. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.

– शांत झोप लागण्यासाठी तळपायाची रोज मालिश करा. झोपेआधी तळपायाची मालिश करा. तुम्हाला शांत आणि लवकर झोप लागेल.

– पायाची मालिश करण्यासाठी तीळाचे तेल वापरावे. महत्त्वाचे म्हणजे तेल गरम करूनच तळपायाची मालिश करावी.