घोरणं ही एक सामान्य समस्या आहे. परंतु त्याचा त्रास इतर व्यक्तींना होतो. आपण जागे असतो तेव्हा श्वासोच्छवासाची वाहिनी रुंद असते आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती अरुंद होते. म्हणून, जेव्हा श्वास घेतला जातो, तेव्हा घशात कंपन होते आणि व्यक्ती घोरते. ही समस्या काही लोकांमध्ये असते. घसा स्वच्छ आणि साफ ठेवल्याने घोरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. काही पदार्थांच्या मदतीने घोरण्याची समस्या कमी होऊ होऊ शकते. जाणून घ्या –

हळदीचे दूध
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या.
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे नाकातील अरुंद मार्ग उघडण्यास मदत करतात. तसेच घसा निरोगी ठेवतात.

कांदा
घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी रात्रीच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा समावेश करावा. कांद्याचा तीव्र वास तुमच्या मेंदूला आराम देतो आणि तुम्हाला न घोरता झोपायला मदत करतो.

मध
रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या त्रास कमी होतो. तसेच मधात ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध पाण्यासोबत सेवन करावा. त्यामुळे घसा आणि नाकाला आराम मिळेल.

सोया दूध
घोरण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी गाईच्या दुधाऐवजी सोया दूध पिण्यास प्राधान्य द्यावे. कारण सामान्य दुग्धजन्य पदार्थ कफ तयार करतात. त्यामुळे घोरण्याची समस्या वाढते.