देशात कोरोना खूपच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण मोहिमही राबवली जात आहे. परंतु कोरोनाची लक्षणे कोणती, कोरोनापासून बचाव कसा करावा हे अनेकांना माहित नाही. चला तर मग जाणून घेऊ कोरोनाची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा करायचा.

* कोरोनाची लक्षणे-
कोरोना व्हायरसची तीन प्रमुख लक्षणं आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास लगेच टेस्ट करून घ्यावी.
– न थांबणारा खोकला-
कधीकधी एवढा खोकला येतो की हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येतो. दिवसभरात दोन ते तीन वेळेस असं होवू शकतं की अचानक न थांबणारा खोकला येतो.
– ताप येणं
कोरोनाचं आणखी एक लक्षणं म्हणजे ताप येणं. शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांकडे जावं.
– तोंडाची चव जाणे आणि वास येण्याची क्षमता बदलणे-
कोरोनाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तोंडाची चव जाणे आणि वास न येणे. तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याची चव न येणे. तसेच त्या पदार्थाची चव खूपच बदलली आहे असं वाटतं. शिवाय तुम्हाला वास येत नाही. या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात.

टीप- तुम्हाला जर ही तीनही लक्षणं जाणवत असतील तर लगेच कोरोनाची टेस्ट करून घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत टेस्टचा निकाल येत नाही तोपर्यंत घरीच राहा. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे घाबरुन जावू नका.

*कोरोनापासून असं करा संरक्षण –
– आजारी व्यक्तींच्या जवळ जाऊ नका.
– हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका.
– शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.
– साबणाने नियमित हात धुवा.