नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. अनेकजण नवीन वर्षात नवीन संकल्प करतात. तर काहींचे नवीन वर्षातील सणांकडे लक्ष असते. नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील वर्षातील पहिला सण मानला जातो.
परंतु अनेकांच्या मनात प्रश्न पडत आहे की मकर संक्रांत नक्की १४ तारखेला आहे की १५ तारखेला. चला तर मग जाणून घेऊ नक्की किती तारखेला आहे मकर संक्रांत.
पंचांगानुसार, २०२३ मध्ये, मकर संक्रांतीचा सण रविवारी, १५ जानेवारी रोजी साजरा केला जाईल. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त ०७:१५ ते १२:३० पर्यंत असेल आणि महा पुण्यकाळ मुहूर्त ०७ :१५ ते ०९:१५ पर्यंत असेल.