अनेकांच्या घरात फ्रीज उपलब्ध असतो. त्यामध्ये अनेक लोक भाज्या, अंडी ठेवत असतात. तसेच इतरही वस्तू ठेवत असतात. शिवाय अन्नाची नासाडी होऊ नये म्हणूनही अनेक वस्तू फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. जाणून घ्या कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत –
– टोमॅटो
तुम्ही जर फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवत असाल तर ते आजपासूनच टाळा. कारण फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्याने त्याची चव आणि गंध बदलतो. तसेच टोमॅटो नरमही होतात. त्यामुळे टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता ते रूममध्ये एका भांड्यात ठेवा.
– बटाटा
बटाटा ही भाजीही फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च कमी तापमानात साखरेत बदलतो. ब्लड शुगरचा किंवा डायबिटीजचा त्रास असेल अशा लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.
– लसूण
लसूणही फ्रीजमध्ये ठेवू नये. ते फ्रीजमध्ये ठेवल्याने कोंदट वातावरणात लसणाचा दर्प पसरू शकतो. यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले अन्य पदार्थही खराब होऊ शकतात. त्यामुळे लसूण बाहेर मोकळ्या वातावरणात ठेवावेत.
– काकडी
काकडी फ्रीजमध्ये ठेवली तर त्या लवकर खराब होऊ शकतात. तसेच काकड्या नरम होतात व त्या खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.