सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. त्यामुळे त्वचेची समस्या अनेकांना जाणवते. थंडीमुळे अनेकांची त्वचा काळी पडते. तसेच चेहराही काळा पडू लागतो शिवाय त्वचेवरील चमक कमी पडते. त्यासाठी सोपा उपाय आहे. तो करून तुम्ही त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता. तसेच त्वचेची चमक परत मिळवू शकता.
– दही आणि मध
अर्धा कप घट्ट दही घ्या आणि त्यात २ चमचे मध टाका. त्यानंतर ते मिश्रण चेहऱ्याला लावा. तसेच मानेलाही ते मिश्रण लावू शकता. २०-२५ मिनिटे ते मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर ते धुवून टाका. असे केल्याने त्वचा मऊ, सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहील.
– दही आणि स्ट्रॉबेरी
त्वचा चमकदार बनवायची असेल तर दही आणि स्ट्रॉबेरीचा वापर करू शकता. त्यासाठी एका कपात दही घ्या. त्यात दोन ते तीन स्ट्रॉबेरी मिसळा. त्यानंतर एक ब्रश घ्या आणि ते मिश्रण चेहऱ्याला लावा. थोडा वेळ ते तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवा.
– दही आणि बेसन
अर्धा कप दूध आणि दही घ्या. त्यात २ चमचे बेसन टाका. त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थोडा वेळ ते सुकून द्या. नंतर पाण्याने धुवा. असे केल्याने त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स स्वच्छ होतात.
– हळद आणि दही
अर्धा कप लो फॅट दह्यात १ चमचा हळद मिसळा. त्यानंतर ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. २०-२५ मिनिटे ते तसेच ठेवा. नंतर पाण्याने ते धुवून टाका.