तांदळाचे पाणी (rice water) म्हणजेच भाताची पेज केवळ आरोग्यासाठीच नाही तर, सौंदर्यवृद्धीसाठीही उपयोगी आहे. जाणून घेऊया तांदळाचे पाणी बनवण्याची पद्धत –
कृती –
अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. दोन कप पाणी आणि हे धुतलेले अर्धा कप तांदूळ एका पातेल्यात शिजायला ठेवा. भात शिजत आल्यानंतर यातील पाणी गाळून घ्या. अशा रितीने तांदळाचे पाणी तयार होईल.
तांदळाच्या पाण्याचे सौंदर्यवर्धक फायदे (Cosmetic benefits of rice water)
1) तांदळाचे पाणी आपल्या चेहऱ्यासाठी एक उत्तम क्लींझर आहे. कापसाच्या मदतीने तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. तसेच चेहऱ्यावरील मुरूम व ओपन पोअर्सची समस्या कमी होते.
2) कोरड्या त्वचेसाठी तांदळाचे पाणी अतिशय गुणकारी आहे. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.
3) तांदळाचे पाणी अँटी-एजिंग म्हणूनही उपयोगी आहे. यामुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
4) सनबर्नचा त्रास कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी उपयुक्त आहे.
5) तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस चमकदार, मजबूत आणि दाट होतात.
6) केसांमध्ये कोंडा असेल तर, तेल आणि तांदळाचे पाणी मिक्स करून केसांची मसाज करा.