सहजपणे उपलब्ध होणारे टोमॅटो अनेक आजारांवर गुणकारी आहे जाणून घ्या टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे –
हाडे मजबूत होतात
टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळते. यामुळे हाडे मजबूत होतात.
तणावमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त
टॉमेटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते.
कर्करोगापासून बचाव
नियमित टॉमेटो खाणार्यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक कर्करोग रोखण्यास फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
अनाशापोटी टोमॅटोचं सेवन केलं तर वजन कमी होण्यास मदत होते.
वजन वाढण्यासाठी मदत करते
जेवणानंतर टोमॅटोचं सेवन केलं तर वजन वाढण्यास मदत होते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. यामुळे नजर वाढते. रातांधळेपणाही कमी होण्यास तसेच मोतीबिंदूची वाढ रोखण्यास मदत होते.
विविध आजारांवर गुणकारी
रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते.
रक्तवाढीसाठी उपयुक्त
शरीरातील रक्तवाढीसाठी टोमॅटो गुणकारी आहे. रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे टोमॅटो खावेत.