कधी कधी डोळे अचानक शुष्क पडतात. डोळ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. डोळे दुखण्यापूर्वीच डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

आहार
डोळयांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या आहारात गाजर आणि पालकाचा वापर करा.

गॉगलचा वापर
उन्हात जाताना गॉगलचा वापर करा.

डोळ्यांना आराम द्या
कॉम्प्युटरवर काम करत असाल तर काही वेळासाठी आपल्या डोळ्यांना आराम द्या. थोड्या थोड्या वेळाने कामातून ब्रेक घ्या.

डोळ्यांना थंडावा द्या
डोळे कधीही चोळू नका. डोळे चोळण्याऐवजी पहिल्यांदा यावर बर्फाच्या थंड पाण्याने धुत राहा. साफ धुतलेला कपडा बर्फाच्या पाण्यात बुडवा आणि काढून त्यातील पाणी पिळून घ्या मग ते डोळ्यावर ठेवा.

मेकअप करताना, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना काळजी घ्या
डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स लावू नका. कॉन्टॅक्ट लेन्स अथवा आय मेकअप कधी कोणाही बरोबर शेअर करू नका

आयड्रॉप्सचा अती वापर करू नका
आयड्रॉप्सचा अती वापर करू नका. स्वतःच्या मानाने आयड्रॉप्स वापरू नये.