कोरड्या त्वचेसाठी वॅसलीन एखाद्या जादू पेक्षा कमी नाही. वॅसलीनने त्वचा तजेलदार राहते. तसेच अन्य त्वचेचे विकारही दूर होतात. याच वॅसलीनमध्ये तुम्ही अन्य काही घरातील घटक टाकून अधिक प्रभावी बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कसे बनवायचे हे वॅसलीन.
या पदार्थांची लागते गरज :
1/2 वाटी नारळाचे तेल
एक चतुर्थांश ऑलिव्ह तेल
30 ग्रॅम मधाच्या पोळाचे मेन
10 ग्रॅम पुदिन्याचे तेल
असे तयार करा वॅसलीन
एक छोट्या भांड्यात नारळाचे तेल आणि पोळ्याचे मेन टाकून कमी आचेवर हे मिश्रण गरम करा. हे मिश्रण वितळवून काढून घ्यावे. त्यानंतर त्यात ऑलिव्ह तेल टाकावे. एकसारखे मिश्रण झाल्यावर त्यात पेपरमिंटचे तेल टाकून पुन्हा गरम करून बॉटलमध्ये भरून ठेवावे.
हे घटक मिसळा :
व्हिटॅमिन ई :
वॅसलीन मध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्याने बरेच परिणामकारक ठरेल. हे लावल्याने पिगेन्टेशनची समस्या दूर होते.
मध :
जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही वॅसलीनमध्ये मध मिसळू शकतात. मधामुळे तुम्ही त्वचा अधिक खुलून दुसेल.
टी ट्री ऑइल :
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही वॅसलीनमध्ये टी ट्री ऑइल मिसळून वापरू शकतात. त्यामुळे त्वचेवर पिंपल येत नाहीत.
व्हिटॅमिन सी सिरम
ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन सी बरेच प्रभावी ठरते. त्यामुळे वॅसलीनमध्ये व्हिटॅमिन सी सिरम टाकून वापरल्यास त्वचा तजेलदार होते.