लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. जाणून घ्या लिची खाण्याचे फायदे –
शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते
शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी तुम्ही लिचीचा आहारात समावेश करू शकता. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत
वजन घटवणार्यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. लीचीमध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचा अधिक तरुण दिसते
लिचीमध्ये अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचा अधिक तरुण दिसते.
पचनसंस्थेचे कार्य सुधारते
लिचीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. लिची खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
तात्काळ एनर्जी मिळते
लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.
रोगप्रतिकारक्षमता सुधारते
लीचीमध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते.
टीप – लिची फळ खाणे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मात्र या फळाचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.