शरीरासाठी आहार जेवढा महत्त्वाच आहे तेवढाच व्यायामही महत्त्वाचा आहे. कारण आहार शरीराला उर्जा देतो तर व्यायाम शरीराला बळकटी प्राप्त करण्यास मदत करते. त्यामुळे रोज जेवण केल्यानंतर चालले पाहिजे. कारण जेवण केल्यानंतर लगेच बसल्यावर वा झोपल्यावर वजन वाढतं. शरीराची चरबी वाढते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर तर नक्कीच चाललं पाहिजे. रात्रीचे जेवण झाल्यावर किमान 10 मिनिटे तरी चालावं. त्याला शतपावली असंही म्हणतात. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याचे फायदे आपण जाणून घेऊ.

– पचन होण्यास मदत
खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन व्हावं असं वाटत असेल तर रोज जेवणानंतर थोडंसं चाला. रोज रात्रीचे जेवण घेतल्यानंतर 10 मिनिटं चालल्यास बद्धकोष्ठतेसारखे आजार टाळता येतात.

– वजन वाढत नाही
रोज जेवण केल्यानंतर थोडंसं चालल्याने वजन नियंत्रणात राहते. जेवणानंतर चालण्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात.

– चांगली झोप लागते
रोज रात्री जेवण केल्यानंतर थोडंसं चाला. त्यामुळे शरीराचा व्यायामही होतो. शिवाय चांगली झोपही लागते.

– फ्रेश वाटतं
जेवण झाल्यानंतर थोडंसं चालल्याने मुड फ्रेश होतो. तसेच मानसिक ताण तणाव दूर होतो.

– रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराचे अवयव व्यवस्थित काम करू लागतात.