चांगला सकस आहार घेणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. सकस आहार घेतल्याने शरीराला तंदुरूस्ती तसेच निरोगी राहण्यास मदत होते. परंतु तरीही शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवते. मग कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं आणि काय नाही ते समजत नाही.
परंतु असे बरेचसे पदार्थ आहेत जे खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
– तीळ
तीळ हा पदार्थ सर्वांना आवडतो. आपल्याकडे तीळाचे लाडूही बनवले जातात. तीळ खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. हे तीळ तुम्ही कडधान्ये किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता.
– आवळा
आवळ्याचे अनेक फायदे आहेत. आवळा खाल्ल्याने शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते. तसेच आवळ्यामध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. यासाठी तुम्ही आवळा ज्यूस वा आवळा पावडर खाऊ शकता.
– नाचणी
नाचणीची भाकरी सर्वांना माहिती असेल. शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर नाचणीची भाकरी खावी. त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. तसेच नाचणीची भाकरी शरीरासाठी पौष्टीक मानली जाते.
– दूधाचे पदार्थ
दूध हा पदार्थ सहज उपलब्ध होतो. तुम्हाला माहिती आहे का दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. त्यामुळे दूध वा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊन तुम्ही शरीराची कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.