जेवण केल्यानंतर अनेकांना आपलं पोट फुगलं आहे असं वाटतं. परंतु त्याचं कारण अनेकांना माहित नसतं. त्याचं खरं कारण आहे खराब पचन प्रक्रिया. त्यामुळे आहारात बदल करून तुम्ही पचनक्रिया सुधारू शकता. त्यामुळे जर पचनक्रिया सुधारायची असेल तर कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया.

– पुदिना चहा
जेवण केल्यानंतर जेव्हाही तुम्हाला आपलं पोट फुगलं आहे असं वाटतं तेव्हा पुदिनाच्या चहाचं सेवन करा. यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होते. शिवाय शरीर हायड्रेट राहते.

– फायबरयुक्त पदार्थ
बद्धकोष्ठतेच्या समस्येने पोट फुगले असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यासाठी बीन्स, सोललेली बटाटे, बिया आणि काजू इत्यादी पदार्थ खाऊ शकता.

– हायड्रेटेड राहा
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी पाहिजे तेवढं पाणी प्यावं. तसेच पोट फुगण्याची समस्या असेल तर आपल्या आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. म्हणजे फळांचा ज्यूस, पाणी प्यावे.