सर्दी आणि ताप आल्यावर अनेकांच्या तोंडाची चव निघून जाते. तोंड कडवट होतं. त्यामुळे काही खाण्याची इच्छा होत नाही. मग काय करावं हे लोकांना समजत नाही. तुम्हालाही जर अशाच समस्यांना सामोरे जावं लागत असेल तर ही माहिती वाचा.

हळद
तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर हळद खूप महत्त्वाची आहे. हळद घ्या त्यात लिंबाचा रस टाका. त्यानंतर ही पेस्ट जीभेवर अन् दातांवर लावा. नंतर थोड्या वेळाने पाण्याने ते स्वच्छ धुवा.

बेकिंग सोडा
तोंडाची चव परत आणायची असेल तर बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. थोडा खाण्याचा सोडा घ्या आणि त्यात 5-6 थेंब लिंबाचा रस घाला. त्यानंतर ही पेस्ट घेऊन दात घासा. नंतर पाण्याने धुवा. असे केल्याने तुमच्या तोंडाची चव लवकरच परतू शकते.

मीठ
मीठ हे सर्वांच्या घरात उपलब्ध असते. तोंडाची चव गेली असेल तर मीठाचाही वापर करू शकता. गरम पाण्यात मीठ घालून गार्गल करा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. यामुळे तोंडाची चव लगेच येते.

दालचिनी
सुरूवातीला एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दालचिनी पावडर मिसळा. या द्रावणात थोडा मध घाला. त्यानंतर याने तोंड स्वच्छ धुवा.