अनेकांना टीव्ही पाहिल्याने, आठ-आठ तास कंम्प्युटरवर काम केल्याने तसेच मोबाईल वापरल्याने डोळ्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे अनेकजण मग त्यावर उपाय शोधायला जातात. काहींना तर नाईलाजाने चष्मा वापरावा लागतो.
त्यामुळे ते नाराज होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि चष्मा लागण्यापासून दूर राहण्यासाठी सोप्पा उपाय आहे. ते म्हणजे ड्रायफ्रूट्स खाण्याचा. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने डोळ्यांना खूप फायदा होतो. तसेच शरीरालाही खूप फायदे होतात.
–अक्रोड
अक्रोड खाल्ल्याने खूप फायदे होतात. यात विटामिन्स, कार्बोहाइड्रेट्स, कल्शियम, आयरन, फॉस्फोरसचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हे खाल्ल्याने डोळ्यांना खूप आराम मिळतो. तसेच दृष्टी सुधारण्यास खूप मदत होते.
– बदाम
अनेकांना बदाम खायला आवडते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते हे सर्वांना माहिती आहे. परंतु बदाम खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टीही सुधारते. बदाममध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं. बदाम खाताना ते मोजक्या प्रमाणात खा नाहीतर मोठी समस्याही होते.
– जर्दाळू
जर्दाळू खाल्ल्यानेही डोळ्याची दृष्टी वाढते. यात बीटा कॅरेटिनंच प्रमाण असतं जे दृष्टी वाढवण्यास मदत करतं. तसेच यामुळे डोळ्यांचं एजिंग रोखण्यास मदत होते.